देवणी : – मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या लहुजी शक्ती सेना या देशव्यापी संघटनेच्या देवणी व शिरूर अनंतपाळ विभागातील नव निर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा पदानियुक्तीपत्र प्रदान सोहळा देवणी येथील रसीका महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच संपन्न झाला.
🔥सामाजिक कार्यकर्ते मा.शिवा भाऊ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा मा.मायाताई लोंढे राज्य प्रवक्ते मा.प्रा.दयानंद कांबळे लातूर जिल्हाध्यक्ष मा.बापुसाहेब मगर उदगीर जळकोट विभागाचे जिल्हाध्यक्ष मा.पांडूरंग कसबे युवक जिल्हाध्यक्ष मा.सुनील कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
🔥 या समारंभाचे प्रास्ताविक देवणी – शिरूर अनंतपाळ विभागाचे जिल्हाध्यक्ष मा.उध्दव शिंदे यांनी केले सुत्रसंचालन प्रभाकर कांबळे यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार सुमीत रणदिवे यांनी मानले.
🔸 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री देवणी तालूकाध्यक्ष दयानंद रणादिवे शिरूर अनंतपाळ तालूकाध्यक्ष शाहूराज शिंदे रवि मोतीरावे सत्यम कांबळे दत्ता गायकवाड राम कांबळे अर्जून ससाणे अंबादास सुर्यवंशी बालाजी गायकवाड रामदास कांबळे गणेश रणदिवे बबलू कांबळे गोवींद अर्जुने किशन पाटोळे किशोर जगताप महालिंग शिंदे संदीपान शिंदे कृष्णा रणदिवे आदीसह देवणी व शिरूर अनंतपाळ विभागातील मातंग समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👍👍👍🌹🌹🌹
