Search
Close this search box.

पुण्यातील बड्या सराफा व्यावसायिकाला बिश्नोई गँगकडून धमकी

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

<

पुणे : पुण्यातील एका नामांकित सराफा व्यावसायिकाला बिश्नोई गॅंग कडून धमकीचा मेल आल्याची धक्कादायक घटना घडलीय. बिश्नोई गॅंग च्या नावाने हा मेल आल्याने आता सराफा व्यावसायिक चांगलाच घाबरला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा मेल परदेशातून आला असल्याचे समजतेय. या मेलच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या संपूर्ण घटनेवर आता पोलिसांकडून गुप्तता बाळवत युद्धपातळीवर तपास सुरू असल्याचे देखील समजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गॅंगने या सर्व हत्येची जबाबदारी घेतली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुण्यातील एका बड्या सराफा व्यावसायिकाला बिश्नोई गॅंग च्या नावाने मेल आल्याने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे तसेच पोलीस प्रशासन देखील आता अलर्ट मोडवर येऊन काम करत आहे.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz Open / Ai Website / Ai Tool

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.