Search
Close this search box.

पैशांच्या वादातून तरुणाचे अपहरण करुन केली मारहाण

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरुन मित्राला न बोलावल्याने एका तरुणाचे अपहरण करुन त्याच्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सिद्धार्थ अशोक बचाटे (वय २३, रा. किरकटवाडी) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ज्योतिरादित्य गिते (वय ३६, रा. मोंजरी व त्याच्या ६ ते ७ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २३ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान डेक्कन पीएमटी बसस्टॉप ते वानवडीतील संविधान चौक दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र रवी वाघमारे याला आरोपी ज्योतिरा गिते याने पैसे दिले होते. तो पैसे वेळेवर परत करत नसल्याने गिते याने वाघमारे याला बोलविण्यास सांगितले होते. फिर्यादी याने रवी वाघमारे याला बोलावून घेतले नाही़ याचा राग मनात धरुन गिते व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना मारहाण केली. पांढर्‍या रंगाच्या कारमध्ये जबरदस्तीने बसवून वानवडीतील संविधान चौकात नेले. तेथे कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात, पाठीवर, हातावर वार करुन गंभीर जखमी केले. फिर्यादी यांनी उपचार केल्यानंतर डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील तपास करीत आहेत.

मुख्य संपादक : नितीन मधुकर वायदंडे

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.