Search
Close this search box.

मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शप्पथ घेतली

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे लोकसभा मतदार संघातील निर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शप्पथ घेतली आहे. स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर पदानंतर थेट केंद्रीय मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने पुण्याच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मेट्रो, नदी सुधार आणि नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या कामांना गती मिळाली. चोवीस तास पाणी पुरवठा आणि पीएमपीचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात आली. योगायोगाने या कालावधीत महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर असा सुमारे साडेतीन वर्ष प्रमुख पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मोहोळ यांना मिळाली. या प्रकल्पांसोबत महापालिकेचे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय देखील सुरू करण्यात मोहोळ यांनी पुढाकार घेतला. 2020 मध्ये कोरोनाच्या साथीत आरोग्य व्यवस्था चांगली राहील यासाठी त्यांनी कटाक्षाने प्रयत्न केले. याचे सर्वस्तरातून कौतुक झाले.
मोहोळ यांच्या कामाचा धडाका पाहूनच स्पर्धा असतानाही भाजपकडून त्यांना पहिल्याच यादीत लोकसभेची उमेदवारी मिळाली.
त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेस चे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत सव्वा लाखाहून अधिक मतांनी विजय मिळविला.
या विजयाचा गुलाल उतरत नाही तोच पक्षाने त्यांना मंत्री पदावर संधी दिल्याने दुधात साखर पडली आहे.
मंत्रालयाचा कारभार सांभाळतानाच पुणे शहरासाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होईल.
केंद्रीय तसेच राज्य पातळीवर तांत्रिक बाबींसाठी अडकलेल्या प्रकल्पांचा देखील पाठपुरावा करून त्यांना गती मिळेल.
पुणेकरांचे जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करतील अशी सर्वसामान्य पुणेकरांची अपेक्षा आहे.

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool