मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्यून आय टी पार्कमधील मतदान केंद्रात सहकुटुंब जाऊन मतदान केले.
मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आज सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत असून, सुदृढ लोकशाहीसाठी तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी, महासत्ता बनवण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकण्यासाठी आवर्जून मतदान करावे असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे आणि सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.
