Search
Close this search box.

टिंबर मार्केट मधील एक भलेमोठे झाड टेम्पो वर कोसळले

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे :- टिंबर मार्केट मधील गोपाल शिवदास दुकानासमोरील एक भलेमोठे झाड आज (दि.१८) टेम्पो वर कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत झाडाखाली उभ्या असलेल्या टाटा सुपर टेम्पो किरकोळ नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून सदर झाड हटविले आहे.अग्निशमन विभागाला आज (दि.१८) सायंकाळी ०५.४५ वाजता टिंबर मार्केट मधील गोपाल शिवदास दुकानासमोरील एक भलेमोठे झाड कोसळले असल्याची माहिती नागरिकांनी दिली. ही माहिती प्राप्त होताच मध्यवर्ती अग्निशमन केंद्र(महात्मा फुले पेठ) अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले. घटनास्थळी एम.एच.१२. क्यू सी. ९९६४, टाटा सुपर टेम्पोवर झाड पडले होते.
मध्यवर्ती अग्निशमन केंद्राचे,स्टेशन ऑफिसर रामटेके व अग्निशमन दलाचे ७ ते ८ जवानांनी यांनी झाड कट करून गाडी बाजूला केली. या दुर्घटनेत कोणीही व्यक्ती जखमी झालेला नसून गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

Leave a Comment

पुढे वाचा