संदीपसिंह गिल हे एक कर्तव्यदक्ष, लोकाभिमुख आणि समाजातील सर्व घटकांमध्ये सहज मिसळणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. पुणे शहर पोलिस दलात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त (DCP Zone 1) म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले असून, त्यावेळचा त्यांच्या नेतृत्वातील गुन्हे नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्थेवरील प्रभाव सर्वांनी अनुभवलाय.
गिल यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, तत्परता आणि जनतेशी थेट संवाद हे नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. त्यांच्या नव्या भूमिकेचे संपूर्ण पुणे जिल्ह्यात स्वागत केले जात आहे.
मुख्य संपादक : नितीन वायदंडे
