तुळजापूर./
20 मे रोजी मुंबई येथे होत असलेल्या महामोर्चाच्या संदर्भात काल तुळजापूर येथे लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माझी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणजी ढोबळे सर तसेच माजी राज्य मंत्री उत्तम प्रकाश खंदारे साहेब लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष कैलास दादा खंदारे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मायाताई लोंढे,लहुजी शक्ती सेनेचे मराठवाडा युवक अध्यक्ष विजय चांदणे,समन्वयक पंडित सुर्यवंशी साहेब, सुरेश पाटोळे साहेब,नगरसेवक किशोर साठे,युवराज शिंदे,लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव बालाजीभाऊ गायकवाड,प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी भाऊ गायकवाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव महाराज भोसले, लहुजी शक्ती सेनेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्ष सारिका ताई कांबळे तसेच बीड जिल्हाध्यक्ष प्रियंका ताई लांडगे महिला आघाडी परंडा तालुकाध्यक्षा राजश्रीताई चव्हाण,केज तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ लाडगे बीड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन भाऊ गालफाडे धाराशिव जिल्हा युवक अध्यक्ष प्राध्यापक दत्ताभाऊ साठे सुदेश भाऊ शिंदे कळंब तालुका अध्यक्ष मोनिकाताई कांबळे जिल्हा उपप्रसिद्धीप्रमुख विकास भाऊ गायकवाड जिल्हा संघटक बालाजी भाऊ उपरे यासह महाराष्ट्रातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते नेते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये महाआरती करून या सरकारला आरक्षण वर्गीकरणा संदर्भात सदबुद्धी येवो अशी प्रार्थना करण्यात आली तसेच मंदिरापासून भव्य रॅली काढून आरक्षण वर्गीकरण झालेच पाहिजे अशा घोषणा देत कार्यक्रमाच्या स्थळी रथ पोहोचवण्यात आला यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले व 20 तारखेचा मोर्चा हा मातंग समाजाच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा होण्यासाठी सर्वांनी तन-मन-धनाने प्रयत्न करावेत असा एकमुखी ठराव घेण्यात आला तसेच एकच लक्ष पाच लक्ष असे न बोलता एकच लक्ष लाखोंचे लक्ष असे बोलून समाजाची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी या महामोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आव्हान अध्यक्षीय भाषणामध्ये विष्णू भाऊ कसबे यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुजी शक्ती सेनेचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक विजय क्षीरसागर सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहुजी शक्ती सेना धाराशिव जिल्हा तसेच सकल मातंग समाज तुळजापूरच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
