Search
Close this search box.

सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या युवकाला हडपसरमध्ये शस्त्रासह अटक

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : सोशल मीडियावर गुन्हेगारी स्टेट्स टाकून परिसरात दहशत माजवणाऱ्या एका युवकाला गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने शस्त्रासह अटक केली आहे. शनिवारी (ता. ९ मे) दणकट मारुती मित्र मंडळाजवळ, रामटेकडी हडपसर येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. याबाबत गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी माहिती दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव स्तवन उर्फ जय शमुवेल भंडारकर (वय १९, रा. लक्ष्मी नगर, रामटेकडी, हडपसर) असे आहे. या प्रकरणी त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस अंमलदार शनिवारी आपल्या हद्दीत गस्त घालत असताना, सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीची स्टेट्स टाकून दहशत निर्माण करणारा जय भंडारकर हा रामटेकडी परिसरात थांबलेला असल्याची गोपनीय माहिती अंमलदार शेखर काटे यांना मिळाली होती.
ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, बाळासाहेब सकटे, शेखर काटे यांच्या पथकाने स्तवन भंडारकर याला दणकट मारुती मित्र मंडळाजवळून अटक केली. झडतीदरम्यान त्याच्याकडून एक धारदार लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले.
या प्रकरणी त्याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १९७/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ४(२५), ३७(१)(३) सह कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य संपादक : नितीन वायदंडे

Leave a Comment

पुढे वाचा

Buzz4 Ai