‼️ वाघोली, पुणे येथे मातंग समाजावर अन्याय – लहुजी शक्ती सेना मैदानात उतरणार ‼️
वाघोली, पुणे येथे प्रशासनाचा अमानुष चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. गरीब आणि मागासवर्गीय समाजाच्या झोपड्यांवर प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता बुलडोझर चालवला आहे. विशेषतः मातंग समाजाला टार्गेट करून त्यांचे घरटे उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही!
लहुजी शक्ती सेनेच्या पुणे जिल्हा अध्यक्ष फुलाताई थोरात यांच्यासह अनेक समाजबांधवांना प्रशासनाच्या या कठोर कारवाईचा फटका बसला आहे. ही कारवाई राजकीय आदेशांवर चालते आहे का? गरीब, वंचित आणि मागासवर्गीयांच्या जगण्यासाठीची झोपडीही सरकारला खुपते आहे का?
हे केवळ अतिक्रमण हटवण्याचे प्रकरण नाही, तर गरीब व मागासवर्गीय समाजावरचा हा नियोजनबद्ध हल्ला आहे!
लहुजी शक्ती सेना मैदानात – अन्यायाविरोधात लढा तीव्र करणार!
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विष्णूभाऊ कसबे साहेब व प्रदेशाध्यक्ष मा. श्री. कैलासदादा खंदारे, प्रदेश उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण ,राज्य संपर्कप्रमुख नितीन भाऊ वायदंडे ,हडपसर विधानसभा अध्यक्ष रामभाऊ देडे, कोथरूड पुणे शहर संपर्कप्रमुख संदीप भाऊ गायके, अनिकेत भाऊ हजारे यांनी वाघोली येथे भेट देऊन पीडित कुटुंबांची विचारपूस केली आणि प्रशासनाच्या अन्यायकारक कारवाईचा तीव्र निषेध केला.
लहुजी शक्ती सेनेची प्रमुख मागणी:
1️⃣ मातंग समाज व मागासवर्गीय समाजावर अन्याय थांबवा!
2️⃣ राजकीय नेत्यांच्या व श्रीमंतांच्या बेकायदेशीर इमारतींवरही बुलडोझर चालवा!
3️⃣3️⃣ प्रशासनाने त्वरित स्पष्टीकरण द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल!
#मातंग_समाज_महाअधिवेशन #vishnubhau_kailasdada #लहूजी_शक्ती_सेना_महाराष्ट्र_राज्य
#brand_of_maharashtra
