Search
Close this search box.

घरात शिरुन पैशांची मागणी करुन जबरदस्तीने खिशातील पैसे चोरुन नेणाऱ्या दोघांना अटक

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : तुमच्या येथे राहणार्‍याला सर्व विषय माहिती आहे, असे सांगून ४ हजार रुपये द्या, अशी मागणी करुन जबरदस्तीने खिशातील पैसे घेऊन जबरी चोरी करणार्‍या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. प्रदिप मंगेश सोनवणे (वय २१, रा. आंबेडकरनगर, गल्ली क्रमांक ५, कोंढवा) आणि सुजल विकास वानखेडे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका २३ वर्षाच्या तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील जागडेनगरमधील विरीना अपार्टमेंट येथे बुधवारी रात्री पावणेबारा ते गुरुवारी पहाटे दीडच्या दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र असे दोघे फिर्यादीच्या चुलत भावाच्या फ्लॅटवर गेले होते. यावेळी प्रदिप सोनवणे व सुजल वानखेडे तेथे आले. त्यांनी स्वप्नील आहे का?, असे विचारले. फिर्यादी यांनी त्यांना तो नाही असे सांगितले. त्यावर स्वप्नीलला सर्व विषय माहिती आहे़ असे म्हणून स्वप्नीलकडून मला पैसे येणे आहेत. तो नाही तर तुम्ही मला ४ हजार रुपये द्य. असे म्हणून पैशांची मागणी केली. प्रदीप सोनवणे याने फिर्यादी व त्यांचे मित्रास त्याच्याकडील हत्यार दाखवून धमकाविले. फिर्यादी व त्याचा मित्र यांचे खिसे तपासले़ फिर्यादी यांच्यावर हत्यार उगारुन व जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील ६०० रुपये व त्यांचा मित्र याच्या पाकीटातील ४०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. स्वारगेट पोलिसांनी त्याची तक्रार घेऊन दोघांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विद्या सावंत तपास करीत आहेत.

Tejas Ballal
Author: Tejas Ballal

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz4 Ai

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.