नायगाव ::-(नं.का.न्युज) स्वतःला तत्ववादी आणि प्रामाणिक अधिकारी असल्याचा देखावा करणारे मरखेल पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे हे २० हजाराच्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्याने त्यांचा तत्ववादी आणि प्रामाणिकतेचा बुरखा फाटला असून ते उघडे पडले आहेत.
नांदेड पोलीस दलात कुठल्याही प्रकरणात शेन खाणारे अधिकारी असल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असून या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आपल्याला पगार असून आपण समाजाचे काहीतरी देणे असतो याचा विसर पडला आहे. त्यामुळे ज्या पोलीस ठाण्याचा कारभार बघत होते त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने केलेल्या पापचा घडा फुटल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
यातील तक्रारदार यांची मौ. मरतोळी, ता. देगलुर येथील शेत गट क्र. १०१/१ चे शिवारात १ हेक्टर वडीलोपार्जीत शेती आहे. सदरच्या शेतीमध्ये त्यांचे शेताचे शेजारी शेत असलेले लोक वारंवार अडथळा आणत असल्याने त्यांनी मा. दिवाणी न्यायालय, देगलूर यांच्याकडून मनाई हुकूम प्राप्त करून घेतला होता. नमूद दिवाणी न्यायालयाचे मनाई हुकूम घेवून तक्रारदार यांनी मरखेल येथील पोलीस ठाण्यात जावून त्यांचे शेता शेजारील लोकांवर प्रतिबंधक कारवाई करणे बाबत सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे यांना विनंती केली. त्यावरून दिघे यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेता शेजारील लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी ४० हजाराची लाच मागीतली. त्यानंतर बीट जमादार दिपक जोगे यांनी तक्रारदार यांना दिघे साहेबांनी ४० हजार रूपये सांगितले आहे, तुम्ही पैसे द्या असे म्हणुन गुन्हयास प्रोत्साहन दिले.
दिपक जोगे व तक्रारदार यांच्यात तड़जोड़ होवून जोगे यांनी मागितलेल्या ४० हजारापैकी २० हजार स्विकारण्याचे मान्य करून खाजगी व्यक्ती शरद रामदास शेरीकर यांचे मोबाईलवर फोन पे वर पाठविण्यास तक्रारदार यांना भाग पाडले. तरी यातील तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाचे चौकशीमध्ये सहायक पोलीस निरीक्षक संकेत वसंतराव दिघे, पोलीस जमादार दिपक प्रल्हाद जोगे यांनी तक्रारदार यांना त्यांचे शेता शेजारील लोकांवर दिवाणी न्यायालयाचे मनाई हुकूमाचे आदेशावरून प्रतिबंधक कारवाई करण्यासाठी ४० हजाराच्या लाचेची मागणी करून २० हजार रूपये खाजगी इसमाचे मोबाईल फोन पेवरून स्विकारले त्यामुळे मरखेल, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sh
