Search
Close this search box.

लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून फसवणूक : मित्रानेही केला नको तिथे स्पर्श

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर लग्न न करता फसवणूक करुन तो कोठेतरी निघुन गेला. आता त्याचे वडिल या तरुणीला माझा मुलगा परत आला नाही तर तुला गोळी मारेल, अशी धमकी देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका तरुणीने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रतिक दलाल (वय २९, मुळ रा. जि. झाजड, हरियाना), सत्यम शिवम (वय २७, रा. दरबंगा, बिहार) आणि विनोदकुमार दलाल (वय ५३, रा. छाडा, जि. झाजड, हरियाना) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बालेवाडी व पाषाण येथे ऑगस्ट २०२० ते जुन २०२४ दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक दलाल याने फिर्यादीशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या संमतीशिवाय तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच अनैसर्गिक शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर फिर्यादीशी लग्न न करता कोठेतरी निघुन गेला. आरोपी सत्यम शिवम हा प्रतिक दलाल याचा मित्र आहे. फिर्यादी, प्रतिक व शिवम हे एकत्र रहात होते. प्रतिक निघून गेल्यानंतर शिवम हा फिर्यादीच्या जवळ येऊन तिला स्पर्श करुन आज मुझे भी खुश कर देना, घरपर कोई नही है, असे म्हणून फिर्यादीचा विनयभंग केला. प्रतिक आणि फिर्यादी यांच्या संबंधांची माहिती त्याचे वडिल विनोदकुमार यांना समजल्यावर त्यांनी फिर्यादी यांना फोन करुन मेरा बेटा नही मिलेगा तो तुम को गोली मार दुंगा, अशी धमकी दिली. पोलीस प्रतिक दलाल याचा शोध घेत असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz4 Ai

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.