सातारा जिल्हातील सर्व विधानसभा मतदार संघात लहुजी शक्ती सेना मजबूत महत्वपूर्ण भूमिका बजावणार – संस्थापक विष्णुभाऊ कसबे
लहुजी शक्ती सेना सातारा जिल्हास्तरीय बैठक खंडाळा येथे संस्थापक अध्यक्ष मा. विष्णुभाऊ कसबे साहेब प्रदेशाध्यक्ष कैलास दादा खंदारे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय सोनावले सर यांचे उपस्थितीत संपन्न झाली त्यावेळी मार्गदर्शन करताना कसबे साहेब बोलताना म्हणाले की लहुजी शक्ती सेना महाराष्ट्रासह इतर राज्यात मोठ्या ताकतीने काम करत असून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात संघटनेची बांधणी बूथ लेवल पर्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे त्याचप्रमाणे जिल्हा कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी सर्व विधानसभा अध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष,युवक आघाडी,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अलका बोभाटे मॅडम सदस्या, पंचायत समिती सातारा, शोभा जाधव सदस्या, पंचायत समिती खंडाळा, विजया खरात उपाध्यक्ष जयश्री खुडे तालुका अध्यक्ष खंडाळा सदस्या, ग्रामपंचायत पाडेगाव यांचे माध्यमातून सर्व जिल्हात संघटना तळागाळापर्यंत पोहचवली असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा घटकपक्ष म्हणून जोमाने काम करावे व महत्वपूर्ण भूमिका बजवावी. तसेच फलटण मतदार संघात मातंग समाजाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना सर्व पदाधिकारी यांना केली प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी संघटनात्मक पुढील वाटचाली साठी काही सूचित करून मार्गदर्शन केले.
बैठकी अगोदर तालुक्यातील अंदोरी, भादे, पिंपरे बु ll, शिवाजीनगर, पाडेगाव येथील संघटनेच्या शाखेचे उत्साहात उदघाटन झाले कार्यक्रमासाठी श्री बाळासाहेब होवाळ सरपंच अंदोरी, नितीन वायदंडे (पुणे), राहुल वाघमारे, अनिकेत हजारे, नितीन दोडके, कैलास भिसे तालुका अध्यक्ष खंडाळा, सदस्य, ग्रामपंचायत अंदोरी, दिपक खवळे अध्यक्ष माण तालुका शामराव खिलारे, गणेश भिसे, विलास बाबर,निलेश भिसे सदस्य, लहुजी वस्ताद स्मारक समिती,शंकर जाधव,रामभाऊ पाटोळे, ऍड प्रशांत साठे,अप्पासाहेब ननावरे, महेंद्र खरात,हनुमंत सोनावणे जिवन सोनावले,किरण आवळे,पूनम कवळे, राणी चव्हाण सर्व तालुका अध्यक्ष, महिला अध्यक्ष, व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानाजी खुडे,ऍड स्वप्निल सूर्यवंशी, सुरज वाघमारे,आकाश वाघमारे, सुनिल जाधव, सुरेश जाधव,चंद्रकांत कुचेकर आकाश कुचेकर,विठ्ठल भिसे,बबन रिठे, अविनाश सपकाळ, दादा रिठे, ऋषिकेश आदिनाथ भिसे, किरण भिसे, ऋषिकेश संतोष भिसे, सुभाष रिठे,अजय भिसे, स्मित सूर्यवंशी,विशाल जाधव, राहुल जाधव, मनोज जाधव,विजय जाधव, नारायण जाधव, शंभूराज जाधव,मुकेश सपकाळ, ऋषिकेश सपकाळ,प्रशांत सपकाळ,अनिकेत सपकाळ यांनी परिश्रम घेतले.href=”https://maharashtrafastdigitalnews.in/wp-content/uploads/2024/09/IMG-20240928-WA0440.jpg”>
