Search
Close this search box.

नोकरीच्या अमिषाने फसवणूक करणारा जवान ताब्यात; लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जवानाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून ही कारवाई करण्यात आली. शत्रुघ्न तिवारी (वय २६, रा. गणेश कृपा चाळ, कल्याण, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुण सिंहगड परिसरात राहायला आहे. आरोपी तिवारीने लष्करात भरतीची संधी अशी जाहिरात समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. जाहिरात वाचल्यानंतर तक्रारदार तरुण तिवारीच्या संपर्कात आला. तिवारीने लष्कर भरतीचे अमिष दाखवून तरुणाकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तरुणाला ससून रुग्णालयाच्या परिसरात बोलवले. तक्रारदार तरुणाला संशय आल्याने त्याने पैसे दिले नाही. तिवारी लष्करात जवान आहे. लष्करी सेवा अर्धवट सोडून तो पसार झाला होता. त्याने लष्करात नोकरीची संधी अशी जाहिरात समाजमाध्यमात प्रसारित केली होती. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तिवारीने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत.

मुख्य संपादक : नितीन मधुकर वायदंडे

Leave a Comment

पुढे वाचा

  • Buzz4 Ai
  • Buzz Open / Ai Website / Ai Tool