Search
Close this search box.

#लहुजी शक्ती सेना व लसाकम शाखा चाकूरच्या वतीने मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चाकूर : – येथील लहुजी शक्ती सेना व ‘लसाकम ‘ या सामाजिक संघटनेच्या वतीने मातंग समाजातील इयत्ता १० वी व १२ वी वर्गात विशेष प्राविण्यासह उतीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आज मान्यवरांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
🔸 लहुजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील जेष्ठ विचारवंत मा.प्राचार्य डॉ.माधवराव गादेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जेष्ठ नेते मा.बालाजी पाटील चाकूरकर माजी नगराध्यक्ष मा. मिलींद महालिंगे लहुजी शक्ती सेनेचे राज्य प्रवक्ते दयानंद कांबळे यांची समायोचीत भाषणे झाली.
🔹 यावेळी विचारपिठावर सिनेट सदस्य मा.ॲड.युवराज पाटील नगरसेवक मा.अभिमन्यू धोंडगे रामभाऊ कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.
🔹 आपला अध्यक्षीय समारोप करताना मा.प्राचार्य.डॉ.माधवराव गादेकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी संपादन केलेली गुणवत्ता टिकवून उच्चपदावर जाताना आई वडीलांच्या कष्टाचा विसर पडू देऊ नये तथापी या गुणवंतानी सामाजिक योगदानासाठीही पुढे येण्याची गरज आहे.
🔹 या समारंभाचे प्रास्ताविक ‘ लसाकम ‘ चे जिल्हासचिव धनराज सुर्यवंशी यांनी केले सुत्रसंचालन लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा सचिव संतराम मोठेराव यांनी केले तर शेवटी सर्व उपस्थितांचे आभार लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष राम मोठेराव यांनी मानले.
🔹या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री शाम मोठेराव दिवाकर मोठेराव शिवाजी हनमंते बाबुराव भालेराव महेश नाईकवाडे नागोराव आवळे गंगाधर मोगले ज्ञानोबा नाईकवाडे मधुकर मोगले अश्वीन शिंदे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.