बारामती लोकसभा मतदासंघ कडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. या निकालामध्ये सुप्रिया सुळे या दीड लाखांच्या लीडने निवडून आल्या आहे. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची अटीतटीची लढत होणार असं सर्वांना वाटत होत मात्र सुप्रिया सुळेंनी मोठा विजय मिळवला.
दौंड विधानसभा मतदारसंघातूनही सुप्रिया सुळेंना २६,३३७ चं लीड मिळालं, इंदापूर मतदारसंघातूनही सुप्रिया सुळेंना २५, ९५१ मतांच लीड, अजित पवार यांचा स्वत:चा मतदारसंघातूनही सुप्रिया सुळेंना सर्वाधिक ४७,३८१ मतांच लीड मिळालं. पुरंदर मतदारसंघातूनही सुप्रिया सुळेंना ३५ हजार मतांचं लीड, भोर तालुक्यातही सुप्रिया सुळे यांना दुसरं सर्वाधिक ४३,८०५ लीड मिळालं. खडकवासला येथे सुप्रिया सुळे यांना फटका बसला, या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना २०,७४६ मतांचं लीड मिळालं होतं. तर सुप्रिया सुळे यांना एकूण ७,३१,४०० तर सुनेत्रा पवार यांना एकूण ५,७३,३९१ मते मिळाली आहेत. सुप्रिया सुळे एकूण १, ५८, ००९ लीडने निवडून आल्या.
अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्यांनी आपली पूर्ण ताकद लावली होती. जनतेने सुप्रिया सुळे यांना कौल दिला.
Author: Datta Dhade
Datta dhade