येडेश्वरी माता श्री क्षेत्र येरमाळा येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले दिनांक.१३ एप्रिल २०२५
येरमाळा (धाराशिव) : येडेश्वरी माता श्री क्षेत्र येरमाळा येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मदत वाटप कार्यक्रम पार पडला. धुळे लोकसभा मतदारसंघाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून २५,००० फुटींचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या ‘सामाजिक सेवाकुंड’ या उपक्रमातून दोन लाख पाण्याच्या बाटल्यांचे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत २५,००० ORS पावडरचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या हस्ते करण्यात आलेकार्यक्रमाचे आयोजन
लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल भाऊ चव्हाण यांनी केले होते. .
या वेळी लहुजी शक्ती सेनेचे महासचिव बालाजीभाऊ गायकवाड, राज्य संपर्क प्रमुख नितीनदादा वायदंडे, युवक कोषाध्यक्ष सागर भाऊ कसबे, मुंबई प्रदेश कोअर कमिटी अध्यक्ष बाळूभाऊ जाधव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष दत्ताभाऊ धडे, किसन नाना हनवते, परशुराम भाऊ क्षीरसागर, पुणे शहर युवक अध्यक्ष तेजस भाऊ बल्लाळ, पुणे शहर सचिव कुमार भाऊ खंडागळे, बार्शी शहर युवक अध्यक्ष दास भाऊ पवार, आदित्य भाऊ उकरंडे, अनिरुद्ध भाऊ हिंगे, राम भाऊ देडे, अमोल भाऊ कांबळे, गुरु भाऊ चव्हाण, ओम भाऊ चव्हाण, आनंद भाऊ हनवते, संदीप गायके, सूर्यकांत भाऊ मिसाळ, विजय भाऊ बल्लाळ, अनिकेत भाऊ अनंतवाड, साहिल भाऊ चव्हाण, समर्थ भाऊ कांबळे, मनिषा ताई भिसे व अनिकेत भाऊ हजारे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या उपक्रमामुळे भाविक भक्तांना उन्हाळ्यातील भीषण तापमानात मोठा दिलासा मिळाला असून, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व मान्यवरांचे सहकार्य मोलाचे ठरले
