Search
Close this search box.

पुण्यात रूममेटवर प्राणघातक हल्ला; चाकूने गळ्यावर सपासप केले वार

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पुणे : शिवीगाळ केल्याच्या रागातून रूममेटच्या अंगावर धावून जात त्याचा चाकूने गळा चिरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. नर्‍हे परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश पवार (रा. झोलो पिनाकल, वाल्हेकर चौक, अभिनव कॉलेज) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हल्ल्यात अर्जुन राय रियांग हा गंभीर जखमी झाला आहे. सचिन मधुकर खांबल (वय ४० वर्षे, रा. झोलो पिनाकल, वाल्हेकर चौक, नर्‍हे) यांनी तक्रार दिली आहे. दाखल गुन्ह्यानुसार, ऑक्टोबर २०२४ पासून सचिन खांबल हे महेश पवार आणि अर्जुन राय रियांग हे सोबत राहतात. अर्जुन आणि फिर्यादी हॉस्टेलमध्ये हाऊस

किपिंगचे काम करतात. तर महेश पवार हा त्याच ठिकाणी वॉचमेनचे काम करतो. महेश आणि अर्जुन यांचे वारंवार वाद होतात. अर्जुन हा महेशला आई बहिणीवरून शिवीगाळ करत असल्याने महेशचा अर्जुनवर राग होता. महेश हा अर्जुनला तू बाहेरून पोट भरण्यासाठी आला आहेस, तू आम्हाला जगायला शिकवतोस का? अशा बोलण्यावरूनही त्याच्यात वाद होत होते. दिनांक ४ एप्रिल रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास सचिन हे रूममध्ये असताना शिवीगाळीच्या कारणावरून अर्जुन आणि महेश यांच्यात पुन्हा वाद सुरू झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर महेशने किचनमधील चाकू आणून अर्जुनच्या गळ्यावर वार केले. त्यानंतर अर्जुन खाली पडला. महेशला बाजूला ढकलून देत सचिनने बाजूच्या मित्रांना ओरडून बोलवले. तोपर्यंत महेश तेथून पळून गेला. सचिन यांनी तात्काळ अ‍ॅम्बुलन्सला बोलवून अर्जुनला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड पोलिस करत आहेत.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz Open / Ai Website / Ai Tool

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.