Search
Close this search box.

गोल्फचा चेंडू छातीवर आदळल्याने गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल

👇 बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा


पुणे : येरवड्यात एका अनोख्या घटनेने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. येरवडा परिसरात असलेल्या गोल्फ क्लब कोर्समध्ये गोल्फ खेळताना मारलेला चेंडू थेट उड्डाणपुलावरील दुचाकी स्वाराच्या छातीवर आदळला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गोल्फ क्लब व्यवस्थापनाविरोधात व एका अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (ता. २९) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उड्डाण पुलाजवळ असलेले

गोल्फ क्लब या घटनेमुळे स्थानिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या आधीही गोल्फ क्लब मैदानातुन बॉल वाहनांना आणि पादचाऱ्यांना लागल्याचा प्रकार घडला होता. प्रणील अनिल कुसळे (वय ३५ वर्षे, रा. येरवडा, पुणे) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. जखमी झालेल्या दुचाकीस्वाराने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून गोल्फ क्लब व्यवस्थापन आणि या घटनेला जबाबदार असलेल्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली असून या घटनेप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार रेड्डी करत आहेत.

Aniket Hajare
Author: Aniket Hajare

Leave a Comment

पुढे वाचा

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.

Buzz Open / Ai Website / Ai Tool

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी माता श्री क्षेत्र तुळजापूर येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व लहुजी शक्ती सेनेच्या संयुक्त विद्यमाने पाणी बॉटल, ORS, भाविकांनी जेवण,फ्रुटीचे भावी भक्तांना वाटप करण्यात आले.