पुणे : भरधाव वेगाने चाललेल्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना हांडेवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कात्रज बायपास रस्त्यावरील शौर्यवाडा हॉटेलजवळ सोमवारी (ता. २४) रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात गंभीर जखमी होऊन २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. वैभव मधुकर डिघोळे (वय २६ वर्षे, रा. भोसले व्हिलेज, भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वैभवची बहिण पुजा सांगळे (वय २८, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव डिघोळे हा कुटुंबासोबत फुरसुंगी परिसरात राहतो. वैभव हा नेहमीप्रमाणे सोमवारी दुचाकीवरून चालला होता. दरम्यान दुचाकीवरून जात असताना, त्याची दुचाकी हांडेवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शौर्यवाडा हॉटेलजवळ आली असता, त्यांच्या दुचाकीला कंटेनरने जोरदार धडक दली. या अपघातात वैभव डिघोळे याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, कंटेनर चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवुन, वैभव डिघोळे यांच्या मोटार सायकलला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात वैभव डिघोळे यांना गंभीर जखमी करून मृत्युस कारणीभुत ठरला आहे. अशी फिर्याद पुजा सांगळे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार कंटेनर वरील अज्ञात चालकाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६, २८१, मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ) (ब), १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप
