पुणे शहर व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे हद्दीतील सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ०१ ते २८ अशी कार्यालय असून त्यातील चार ते पाच कार्यालय सोडली तर सर्व कार्यालयांचा भार हा नवखे प्रभारी म्हणजेच वरिष्ठ लिपिक अथवा कनिष्ठ लिपिक यांचे कडे गेले ७ ते ८ महिने पासून असून ते त्यांचे कामकाज पूर्णपणे गैर संविधानिक व मनमानी प्रमाणे करत आहेत,हवेली क्रमांक ०१ श्री स्वप्निल मेंगाने, हवेली क्रमांक ८ सबरजिस्टर सातदिवे हवेली क्रमांक १२ श्री क्षीरसागर, हवेली क्रमांक १४ श्रीमती लाडके मॅडम, हवेली क्रमांक २३ श्रीमती बढे मॅडम, हवेली क्रमांक २६ सोनाली मेंगे मॅडम बोगस एनए ऑर्डर लावून बोगस एनए ऑर्डर लावून रेरा व तुकडा बंदी कायदा पायदळी तुडवत दस्त नोंदणी चालू आहेत, अनेक वेळा वरिष्ठांकडे पुराव्यासकट तक्रार करून सुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात नाही, त्या उलट वरिष्ठांच्या आशीर्वादाने त्या अधिकाऱ्यांना चार्ज देण्यात येत आहे, हे सर्व अधिकारी शासकीय नियमांचे उल्लंघन करून बोगस दस्तनोंदणी करून नागरिकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक करत आहे सदर अधिकाऱ्यांवर योग्यती चौकशी नेमून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मातंग बहुजन संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष मारुती अडागळे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे अन्यथा नागरिकांच्या हिता साठी हजारोच्या संख्येने आंदोलन करण्यात येईन असा इशारा याद्वारे देण्यात आला.